Wednesday, January 2, 2013

Shripad Shri Vallabha Shri Gurudev Datta


श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ॥ त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेति नेति शब्द न ये अनुमाना ॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।। आरती ओंवाळीतां हरली भवचिंता ।।धृ ०।।

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ॥ अभाग्यासी कैची न कळे ही मात ॥
पराही परतली तेथे कैचा हा हेत ॥ जन्म मरणाचा पुरलासे अंत ।। जय ०।।२॥

दत्त येऊनिया उभा ठाकला ॥ सदभावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला ॥ जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। जय ०।।३॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ॥ हरपलें मन झालें उन्मन ॥
मीतूं पणाची झाली बोळवण ॥ एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ।। जय ०।।४॥



श्री सदगुरुरायाची प्रदक्षिणा

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सदगुरुरायाची । 
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ।।धृ ०।।

पदोपदीं अपार झाल्या पुण्याच्या राशी । 
सर्वाहि तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि कशी ॥१॥

मृदंग टाळ घोश भक्त भावार्थे गाती । 
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती ॥२॥

कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत । 
लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ॥३॥

गुरूभजनाचा महिमा न कळे आगमा - निगमांसी । 
अनुभव ते जाणती जे गुरूपदिंचे रहिवासी ॥४॥

प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला । 
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ॥५॥


प्रार्थना

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझें ॥
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन ॥ भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेंद्रिययैर्वा, बुध्दात्मना व प्रक्रतिस्वभावात् ॥
करोनि यद्न सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि ॥
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥