श्री दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती
दत्त हा जाणा ॥ त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेति
नेति शब्द न ये अनुमाना ॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥
जय
देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।। आरती ओंवाळीतां हरली भवचिंता ।।धृ ०।।
सबाह्य
अभ्यंतरी तू एक दत्त ॥ अभाग्यासी कैची न कळे ही मात ॥
पराही
परतली तेथे कैचा हा हेत ॥ जन्म मरणाचा पुरलासे अंत ।। जय ०।।२॥
दत्त
येऊनिया उभा ठाकला ॥ सदभावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न
होउनी आशीर्वाद दिधला ॥ जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। जय ०।।३॥
दत्त
दत्त ऐसें लागले ध्यान ॥ हरपलें मन झालें उन्मन ॥
मीतूं
पणाची झाली बोळवण ॥ एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ।। जय ०।।४॥
श्री सदगुरुरायाची
प्रदक्षिणा
धन्य
धन्य हे प्रदक्षिणा सदगुरुरायाची ।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ।।धृ ०।।
पदोपदीं
अपार झाल्या पुण्याच्या राशी ।
सर्वाहि तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि कशी ॥१॥
मृदंग
टाळ घोश भक्त भावार्थे गाती ।
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती ॥२॥
कोटि
ब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ॥३॥
गुरूभजनाचा
महिमा न कळे आगमा - निगमांसी ।
अनुभव ते जाणती जे गुरूपदिंचे रहिवासी ॥४॥
प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल
पुढें उभा राहिला ॥५॥
प्रार्थना
घालीन लोटांगण वंदीन
चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझें ॥
प्रेमे
आलिंगन आनंदे पूजीन ॥ भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव
माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥
त्वमेव
विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देवदेव ॥२॥
कायेन
वाचा मनसेंद्रिययैर्वा, बुध्दात्मना व प्रक्रतिस्वभावात् ॥
करोनि
यद्न सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥
अच्युतं
केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि ॥
श्रीधरं
माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ॥
हरे
कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥